मुंबई : गेल्यावर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे यंदा राज्य दुष्काळाचा सामना करत आहे. देशातील विविध भागतही हीच परिस्थिती आहे. मात्र दुष्काळाचा सामना करताना स्कायमेट या खासगी संस्थेचा मान्सूनबद्दलच्या अंदाजामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षीचा मान्सून सरासरीइतकाच राहणार आहेत. त्यामुळे दुष्काळाची शक्यता शून्य असल्याच अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.


स्कायमेट या खासगी संस्थेच्या मान्सूनबद्दलच्या प्राथमिक अंदाजानुसार यावर्षी मान्सून सामान्य राहण्याची शक्यता 50 टक्क्यांहून अधिक आहे.  दुष्काळ आणि अतिवर्षा या दोन्हीची शक्यता यावेळी नसल्याचा अंदाज आहे. सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस हा सामान्य समजला जातो, यावेळी 96 ते 100 टक्के पाऊस राहण्याचा स्कायमेटचा अंदाज आहे.


या प्राथमिक अंदाजानंतर पुन्हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा अंदाज स्कायमेट देणार आहे. मात्र हा प्राथमिक अंदाज देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. देशाच्या काही भागांमध्ये कमी पावसाची शक्यता आहे. हे भाग कुठले आहेत याबद्दल पुढच्या अंदाजात चित्र स्पष्ट होईल, असं स्कायमेटनं म्हटलं आहे.





व्हिडीओ- यावर्षी दुष्काळाची शक्यता नाही, समाधानकारक पावासाचा 'स्कायमेट'चा प्राथमिक अंदाज