नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता 15 मे रोजी येणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान कर्नाटकाचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दलितासाठी आपण मुख्यमंत्रिपद सोडायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


''दलितांसाठी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. हायकमांडने आदेश दिल्यास दलित उमेदवाराला मुख्यमंत्रिपद द्यायला मला काहीही हरकत नाही. ही माझी शेवटची निवडणूक होती. यापुढे राजकारणात तर असेल, मात्र निवडणूक लढणार नाही,'' असंही ते म्हणाले.

काँग्रेसचं जेडीएस कार्ड?

मतदानानंतर समोर आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे कुमारस्वामी यांचा पक्ष जेडीएस किंगमेकर ठरणार आहे. काँग्रेसने त्रिशंकू परिस्थितीमध्ये जेडीएसची मदत घेण्यासाठी हे दलित कार्ड खेळलं असावं, अशीही चर्चा आहे.

सिद्धरमैय्या यांनी एक्झिट पोलचे दावे फेटाळले आहेत. एक्झिट पोल हा दोन दिवसांचं मनोरंजन आहे, असं ते म्हणाले.

काय आहे एक्झिट पोल?