मथुरा/मुंबई : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भाविकांनी एकत्र येत मथुरेत मोठ्या उत्साहात साजरा केला. मथुरेतल्या मंदिराला कृष्ण जन्मोत्सवानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती.
वरळीतील प्रभादेवीमध्येही मोठ्या जल्लोषात दहीहंडी फोडण्यात आली. सौरभ मित्र मंडळातर्फे रात्री ठीक बाराच्या ठोक्याला दहीहंडी फोडण्यात आली. उच्च न्यायालयाने निर्बंध घातले असले तरीही या गोविंदांनी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली.
सरकारकडून 9 थरांचींच मर्यादा असल्यामुळे फक्त 4 थर लावूनच दहीहंडी फोडली. कोर्टाचे नियम आणि पोलिसांचा पहारा असला तरीही सगळ्याचा समन्वय राखून मुंबईतील प्रभादेवीमध्ये दहीहंडीचा उत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला.
मुंबईतील गिरगावमध्ये श्रीकृष्ण मंदिरातही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळाली. अनेक भाविक श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी रात्री गिरगावमधील इस्कॉन मंदिरात आले होते. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मंदिराला आणि श्रीकृष्णाला फुलांनी सजवण्यात
आलं. त्या निमित्ताने भाविकांना श्रीकृष्णाचं देखणं रूप पहायला मिळालं. त्याबरोबरच मंदिरात भजनाचा कार्यक्रमही पार पडला.