लातूर : नोबेल शांतता पुरस्कार जर कुठलंही काम न करणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीला मिळू शकतो, तर त्या पुरस्काराची योग्यता किती? असं म्हणत श्रीश्री रविशंकर यांनी नोबेल समिती आणि मलाला युसुफजाईवर नाव न घेता निशाणा साधला आहे. शिवाय, नोबेल पुरस्काराची ऑफर आली तरी आपण ती स्वीकारणार नाही, असंही श्रीश्री रविशंकर यांनी स्पष्ट केलं.


 

श्री श्री रविशंकर लातुरातील मांजरा नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना आपण शांततेच्या नोबेलसाठी प्रयत्न करत आहात का? असा सवाल केल्यानंतर ते बोलत होते.

 

देशातील कृषी धोरण, नद्या पुनरुज्जीवनाबद्दल सरकार गंभीर नसल्याचं श्रीश्रींनी म्हटलं आहे. तसंच शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, त्यांनी देवावर आणि माणुसकीवर विश्वास ठेवावा असं आवाहन श्रीश्रींनी केलं आहे.