शरद पवार अधून-मधून ‘अशा’ पुड्या सोडत असतात: संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2016 01:43 PM (IST)
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तिसऱ्या आघाडीबाबतच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. “शरद पवार अधून-मधून पुड्या सोडत असतात.”, असे राऊत म्हणाले. “शरद पवार अधून-मधून अशा पुड्या सोडत असतात. राष्ट्रीय राजकारणात अशा पुड्यांना त्या काळापुरतं महत्त्व असतं. मात्र, तिसऱ्या आघाडीची मोट बांधणं तितकं सोपं नाहीय.”, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, काल शरद पवारांनी 2019 च्या तिसऱ्या आघाडीबाबत भाष्य केलं होतं. पवार म्हणाले होते, “आगामी काळात भाजपविरोधी पक्ष एकत्र येणं गरजेचं असून, अशाप्रकारे एकत्र आल्यास पंतप्रधान पदाचे उमेदवार नितीशकुमार हे असतील.”