Jammu-Kashmir News : जम्मू-कश्मीरमध्ये शोपियान भागात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत  दोन जवान शहीद झाले  आहे. तर एक दहशतवाद्याला कंठस्नान घातले आबे. या वर्षी काश्मिर खोऱ्यात झालेल्या चकमकीत सुरक्षादलाचे हे पहिले मोठे नुकसान झाले आहे.


काश्मिर झोनचे पोलिल महानिरिक्षक विजय कुमार म्हणाले, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार18 आणि 19 फेब्रुवारीला मध्यरात्री सुरक्षादल आणि पोलिसांनी चेरमार्ग, शोपियान येथे एक संयुक्त अभियान सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी त्या भागाला घेराव घालत  सर्च ऑपरेशन सुरु केलं आणि नागरिकांना बाहेर काढण्यात आले.


पुढे ते म्हणाले, सर्च ऑपरेशन दरम्यान जेव्हा सुरक्षा दल गौहर अहमद भट यांच्या घरी पोहचले. तेव्हा घर मालकाने  तपास यंत्रणेला खोटी माहिती दिली. घरात दहशतवादी असल्याची माहिती लपवली. जेव्हा सुरक्षादल चौकशी करत होते, त्यावेळी घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान गंभीर जखमी झाले.  सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारा लष्कर ए तोयबाचा एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. कारावाईनंतर एक एके रायफल आणि एक बंदुकीसह दारूगोळा जप्त करण्यात आला.


चकमकीत जखमी झालेल्या दोन जवानांचा मृत्यू झाला. संतोष यादव आणि रोमित तानाजी अशी दोन शहिद झालेल्या जवानांची नावे आहेत. पोलिसांनी घर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.  या अगोदर देखील एप्रिल 2020 मध्ये दहशतवाद्यांना लपवल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली होता. त्यानंतर त्यांना ऑगस्ट 2021 मध्ये घरी सोडण्यात आले. तरी देखील दहशतवाद्यांसाठी लपून काम करत होते.


याआधी गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या शोपियांमधील एका मशिदीत दहशतवाद्यांनी प्रवेश केला होता. यावेळी सुरक्षाबलाने 5 दहशतवाद्यांना ठार केलं होतं. दक्षिण काश्मीरच्या अशांत शहरात प्रथमच 20 वर्षांहून अधिक काळांनंतर पाच दहशतवाद्याना ठार करण्यात यश आलं. शोपियांमधील मशिदीत घेराव घालण्याची दहशतवाद्यांची पहिलीच वेळ होती. शोपियानमधील शेवटची मोठी चकमक 1990 च्या उत्तरार्धात झाली होती. त्यावेळी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.