मुंबई : लेखिका शोभा डे यांचे ट्वीट्स अनेक वेळा वाद ओढावून घेत असतात. यावेळी डे यांनी थेट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनाच टार्गेट करत ट्वीट केला. मात्र ही 'ट्विपण्णी' त्यांच्याच अंगलट आली. कारण स्वराज यांची बाजू घेत ट्विटराईट्स शोभा डे यांच्यावरच बरसले.


देशाबाहेर अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांनी ट्विटरवरुन मदत मागितल्यास परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज याची तातडीने दखल घेतात. शक्य ती मदत पोहचवून त्यांना दिलासा देण्याचा स्वराज यांचा कायम प्रयत्न असतो. स्वराज यांच्या तत्परतेचं सोशल मीडियावर वारंवार कौतुकही होताना दिसतं. हाच मुद्दा पकडून शोभा डे यांनी ट्वीट केलं.

https://twitter.com/DeShobhaa/status/819834499672457216
'सुषमा स्वराज : 2017 चा संकल्प- शांत राहा आणि ट्वीट थांबवा' अशा आशयाचा ट्वीट शोभा डे यांनी केला. मात्र डे यांचा ट्वीट वाचून ट्विटराईट्स चांगलेच खवळले. 'एक दिवस तुम्हाला विमानतळावर त्यांची गरज भासेल आणि त्यांच्याकडे ट्विटरवरुन याचना कराल' अशा संयमी ट्वीट्सपासून 'शोभा डेंना फक्त प्रसिद्धी हवी आहे. त्यांची हिंमत असती तर त्यांनी सुषमा यांना टॅग केलं असतं' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटरवर उमटल्या.



https://twitter.com/SirJadeja/status/819963448494850049

https://twitter.com/shalini8282/status/819840767816531969