मुंबईः माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांच्या पुस्तकात त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. 26/11 च्या हल्ल्यानंतरही आपण तत्कालिन यूपीए सरकारला सर्जिकल हल्ले करण्याचा सल्ला दिला होता, मात्र सरकारने राजकारण करत सर्जिकल स्ट्राईक करणं टाळल्याचा आरोप मेनन यांनी केला आहे.


लोकभावनांचा आदर करत भारत सरकारने पाकमधल्या मुद्रिकेमध्ये असलेल्या लष्कर-ए- तैयबाच्या तळावर किंवा पाकव्याप्त काश्मिरमधे सर्जिकल स्ट्राईक केलेच पाहिजेत, असा सल्ला दिल्याचं मेनन यांनी म्हटलं आहे.

मेनन यांनी 'चॉइसेस - इन्साईड द मेकिंग ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी' या पुस्तकात हे गौप्यस्फोट केले आहेत.



शिवशंकर मेनन यांच्या पुस्तकातील आरोप

भारताने 2008 मधे जर सर्जिकल स्ट्राईक करत प्रत्युत्तर दिलं असतं तर भारतीय पोलिस आणि सुरक्षा एजन्सीजला जी काही मान खाली घालावी लागली, ती नामुष्की टळली असती.

लोकांनी तीन दिवस टीव्हीसमोर बसून जे सगळं पाहिलं त्यानंतर लोकांमधे प्रचंड संताप होता आणि त्यावेळी जर स्ट्राईक्स केले असते तर लोकांच्या भावनांना वाट मिळाली असती.

मात्र तत्कालिन सरकारने हल्ले न करता त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मेनन यांनी केला. हे पुस्तक सध्या अमेरिका आणि इंग्लंडमधेच उपलब्ध आहे.