पाकच्या डझनभर चौक्या उद्ध्वस्त, वॉच टॉवरही पाडले
एबीपी माझा वेब टीम | 28 Oct 2016 09:04 AM (IST)
श्रीनगर : भारताने पाकिस्तानला 'इंट का जवाब पत्थर से' दिला आहे. कारण रात्रभर सुरु असलेल्या गोळीबारात भारतीय जवानांनी पाकिस्तानचं मोठं नुकसान केलं आहे. पाकिस्तानच्या शक्करगढ परिसर अक्षरश: उद्ध्वस्त केला आहे. यामध्ये पाकिस्तानचा एक जवान मारला तर एक जवान जखमी झाला आहे. इतकंच नाही तर पाकिस्तानच्या डझनभर चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर टेहळणी करणारे टॉवर अर्थात वॉच टॉवरही उडवले आहेत. भारताच्या या पलटवारामुळे पाकिस्तानी रेंजर्सच्या चौक्यांवर अफरातफरी माजली आहे. दरम्यान या परिसरात अम्बुलन्स दिसत आहेत. मात्र प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर फायरिंग करता येत नाही. जम्मूच्या आरएसपुरा आणि अरनिया सोडून संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार सुरु आहे. कठुआ,सांबा आणि अखनूरमध्ये जोरदार फायरिंग सुरु आहे. यावेळी पाकिस्तानने अत्याधुनिक शस्त्रांद्वारे गोळीबार केला आहे.