नवी दिल्ली: 'पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करा, ज्येष्ठ नागरिकांना बँकातील ठेवींवर 10 टक्के व्याज द्या.' अशा मागण्या शिवसेनेनं केली आहे. आज शिवसेना खासदारांनी अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांची भेट घेतली आणि या मागण्याबाबतचं निवदेन त्यांना सादर केलं.


1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांनी आपल्या अपेक्षांचं पत्र मेघवाल यांच्याकडे दिलं.

नोटाबंदीनंतर देशातील शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णयही अर्थसंकल्पात प्राधान्यानं घेतले जावेत, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वात सेना खासदार मेघवाल यांच्या भेटीसाठी गेले होते.