गोवा लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली, असं संजय राऊत यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात गोव्यात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहितीही संजय राऊतांनी दिली.
आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेलच, पण यापुढे सर्वच राज्यात शिवसेना उमेदवार देईल. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरु, किती मतं पडतील माहित नाही, पण आम्ही लढू असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
हिंदू मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून आतापर्यंत इतर राज्यात निवडणुका लढवल्या नाहीत, पण यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढवणार, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.
पर्रिकरांना हवा मानवली नाही : राऊत
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती लवकर बरी व्हावी आणि ते पुन्हा सक्रिय व्हावेत, अशी सदिच्छाही संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. मनोहर पर्रिकर यांना दिल्लीची हवा मानवली नसावी, असंही यावेळी राऊत म्हणाले.