नवी दिल्ली: दिल्लीत होणाऱ्या तीन आगामी महापालिकेच्या निवडणुकीत आता शिवसेनाही मैदानात उतरणार आहे. दिल्लीत तब्बल दीडशे जागा शिवसेना लढवणार असल्याचं समजतं आहे.


दरम्यान, आज खासदार चंद्रकांत खैरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थितीत प्रचार व्हँनचंही उद्घाटन करण्यात आलं.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे शिवसेनेनं त्याचचं उट्टं काढण्यासाठी आता दिल्लीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भाजपचे नाराज नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत कुठल्याच विद्यमान नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळणार नसल्याचं पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी जाहीर केलं. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. याचाच फायदा घेण्यासाठी आता शिवसेनेनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात दिल्लीतल्या 3 महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.

संबंधित बातम्या:
भाजपचा कौतुकास्पद निर्णय, विद्यमान नगरसेवकांना तिकीट नाही