लखनऊ: अखिलेशने सरकार चालवावं, तर शिवपालने पक्ष चालवावा असे आदेश देत समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम यांनी पक्षातील सत्तासंघर्षावर तात्पुरती मलमपट्टी केली. बैठकीतील आरोप-प्रत्यारोपांनंतर मुलामय यांनी काका-पुतण्याची गळाभेटही घडवून आणली..मात्र अवघ्या काही सेंकदात दोघांमध्ये पुन्हा ठिणगी पडली. अखिलेश खोटे बोलतो असा आऱोप शिवपाल यांनी केला. विशेष म्हणजे व्यासपीठावरच दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली. अमरसिंहांवर आसूड ओढणाऱ्यांना, मुलायम यांनी अमरसिंह आणि शिवपालला कधीच अंतर देणार नाही असं ठकणावलं आहे.त्यामुळे मुलायम यांचा तात्पुरता इलाज किती काळ टिकणार हे पाहावं लागेल. पक्ष चालवण्यावरुन अखिलेश आणि शिवपाल यांच्यात अनेक मतभेद सातत्यानं उफाळून येत असल्यानं यादव कुटुंबात गृहकलह निर्माण झाला आहे. नेमका वाद काय? निवडणुकांच्या तोंडावर जो कोणी पक्षात येईल, त्याला प्रवेश द्यायचा हा शिवपाल यादव यांचा निर्णय. मात्र त्याला मुख्यमंत्री आणि पुतण्या अखिलेश यांचा विरोध होता. त्यातच सप्टेंबर महिन्यात गायत्री प्रजापती, राजकिशोर सिंह या दोन मंत्र्यांना पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरुन अखिलेशनं मंत्रिमंडळातून हाकललं. हे दोन्हीही मंत्री शिवपाल यांच्या जवळचे. त्यानंतर शिवपाल यादव यांची सगळी महत्वाची खाती काढून घेतली. या कृतीनं दोघांमधली दरी चांगलीच रुंदावली. हा सर्व वाद दीड महिन्यापूर्वीचा होता. त्यानंतर स्वत: नेताजींनी म्हणजेच मुलायम सिंहांनी हा वाद मिटवला होता. शिवपाल परत मंत्रिमंडळात आले होते. पुन्हा वाद उफाळला शिवपाल यादव हे मुलायमसिंहांचे लहान बंधू. तेच त्यांच्या जास्त जवळचे आहेत. त्यामुळेच शिवपाल यांनी मंत्रिमंडळात परतल्यानंतर अखिलेश समर्थकांवर धडाधड वार करण्यास सुरुवात केली. अखेरीस या सगळ्याचा स्फोट झाला. अखिलेशनं दीड महिन्याच्या काळात पुन्हा एकदा आपल्या काकाला हिसका दाखवला. थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन. म्हणजे ज्या शिवपाल यांच्याकडे सिंचन, पीडब्लूडी, महसूल यासह सहा महत्वाची खाती होती ते एका झटक्यात मंत्रिमंडळातून बाहेर फेकले गेलेत. अर्थात या चालीला उत्तर द्यायला मुलायम यांना दोन तासही लागले नाहीत. त्यांनी तातडीनं अखिलेशचे गुरु मानले जाणारे रामगोपाल यादव यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं. वर त्यांच्यावर भाजपशी साटंलोटं करुन पक्षाला संपवण्याचा कट रचल्याचा आरोपही केला. कोण कुणाच्या बाजूने?
मुलायम सिंह अखिलेश यादव
शिवपाल यादव (सख्खाभाऊ) पत्नी डिंपल यादव
मुलायम सिंहांची पत्नी साधना रामगोपाल यादव (मुलायम सिंहांचे
मुलगा प्रतिक यादव अक्षय यादव (रामगोपाल यांचे पुत्र)
शिवपाल यांचा मुलगा आदित्य
संबंधित बातम्या दिल्लीदूत : यादवांचं महाभारत... यूपीत पुन्हा 'यादवी', सपा आज फुटणार? उत्तर प्रदेशमध्ये शिवपाल यादवांसहित चार मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी

यादव कुटुंबात महाभारत, नेमका वाद काय?