मुलायम सिंह | अखिलेश यादव |
शिवपाल यादव (सख्खाभाऊ) | पत्नी डिंपल यादव |
मुलायम सिंहांची पत्नी साधना | रामगोपाल यादव (मुलायम सिंहांचे |
मुलगा प्रतिक यादव | अक्षय यादव (रामगोपाल यांचे पुत्र) |
शिवपाल यांचा मुलगा आदित्य |
यूपीत पुन्हा 'यादवी', सपा आज फुटणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Oct 2016 11:02 AM (IST)
NEXT
PREV
नवी दिल्ली: गेल्या दीड महिन्यांपासून उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि मुलगा अखिलेश यादव यांच्यात सुरु असलेली लढाई निर्णायक टप्प्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर यूपीत मुलायमसिंहांची महत्त्वाची बैठक सुरु आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्याचवेळी देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची सत्ता सांभाळणाऱ्या यादव कुटुंबात अंतर्गत कलहाची नांदी सुरु झाली आहे. एका बाजूला 42 वर्षाचा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला त्याचा सख्खा बाप, काका आणि इतर काही बाहेरचे कळलावे नारद.
अखिलेश यादव स्वतःला मुलायम सिंह यांचे राजकीय वारसदार मानतात. त्यामुळेच त्यांनी काल मुलायम सिंह यांना विश्वासात न घेता काका शिवपाल यादवांसह इतर ३ मंत्र्यांची पुन्हा हकालपट्टी केली.
यानंतर मुलायम सिंहदेखील आक्रमक झाले. त्यांनीही काही तासातच अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मुलायमसिंहांचे चुलतबंधू रामगोपाल यादव यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे या वादाने टोक गाठलं आहे.
नेमका वाद काय?
निवडणुकांच्या तोंडावर जो कोणी पक्षात येईल, त्याला प्रवेश द्यायचा हा शिवपाल यादव यांचा निर्णय. मात्र त्याला मुख्यमंत्री आणि पुतण्या अखिलेश यांचा विरोध होता.
त्यातच सप्टेंबर महिन्यात गायत्री प्रजापती, राजकिशोर सिंह या दोन मंत्र्यांना पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरुन अखिलेशनं मंत्रिमंडळातून हाकललं. हे दोन्हीही मंत्री शिवपाल यांच्या जवळचे.
त्यानंतर शिवपाल यादव यांची सगळी महत्वाची खाती काढून घेतली. या कृतीनं दोघांमधली दरी चांगलीच रुंदावली. हा सर्व वाद दीड महिन्यापूर्वीचा होता. त्यानंतर स्वत: नेताजींनी म्हणजेच मुलायम सिंहांनी हा वाद मिटवला होता. शिवपाल परत मंत्रिमंडळात आले होते.
पुन्हा वाद उफाळला
शिवपाल यादव हे मुलायमसिंहांचे लहान बंधू. तेच त्यांच्या जास्त जवळचे आहेत. त्यामुळेच शिवपाल यांनी मंत्रिमंडळात परतल्यानंतर अखिलेश समर्थकांवर धडाधड वार करण्यास सुरुवात केली.
अखेरीस या सगळ्याचा स्फोट झाला. अखिलेशनं दीड महिन्याच्या काळात पुन्हा एकदा आपल्या काकाला हिसका दाखवला. थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन. म्हणजे ज्या शिवपाल यांच्याकडे सिंचन, पीडब्लूडी, महसूल यासह सहा महत्वाची खाती होती ते एका झटक्यात मंत्रिमंडळातून बाहेर फेकले गेलेत. अर्थात या चालीला उत्तर द्यायला मुलायम यांना दोन तासही लागले नाहीत. त्यांनी तातडीनं अखिलेशचे गुरु मानले जाणारे रामगोपाल यादव यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं. वर त्यांच्यावर भाजपशी साटंलोटं करुन पक्षाला संपवण्याचा कट रचल्याचा आरोपही केला.
कोण कुणाच्या बाजूने?
संबंधित बातम्या
उत्तर प्रदेशमध्ये शिवपाल यादवांसहित चार मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी
यादव कुटुंबात महाभारत, नेमका वाद काय?
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -