बंगळुरु : लिंगायत धर्माचं श्रद्धास्थान असलेल्या शिवकुमार स्वामीजी यांचं निधन झालं. कर्नाटकातील तुमकूरमध्ये असलेल्या सिद्धगंगा मठात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवकुमार स्वामीजी 111 वर्षांचे होते.
शिवकुमार स्वामीजी यांचं निधन आज सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी झालं. स्वामीजींवर दोन महिन्यांपूर्वी मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.
स्वामीजी निवर्तल्याने अवघ्या कर्नाटकावर शोककळा पसरली आहे. शिवकुमार स्वामीजींना 'देवाचा चालता बोलता अवतार' मानलं जात होतं.
मठाच्या वेबसाईटनुसार शिवकुमार स्वामीजी यांचा जन्म कर्नाटकातील वीरापुरा गावात एक एप्रिल 1908 रोजी झाला होता. स्वामीजींनी सिद्धगंगा शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती. शिवकुमार स्वामीजी यांना पद्मभूषण आणि कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
कर्नाटकात उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून पुढचे तीन दिवस दुखवटा पाळण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी सांगितलं. स्वामीजींनी अनेकांची आयुष्य घडवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
लिंगायत धर्माचे श्रद्धास्थान शिवकुमार स्वामीजींचं 111 व्या वर्षी निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jan 2019 06:07 PM (IST)
कर्नाटकातील तुमकूरमध्ये असलेल्या सिद्धगंगा मठात शिवकुमार स्वामीजी यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कर्नाटकावर शोककळा पसरली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -