मुंबई : केंद्रीय कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्यासाठी शिवसेना अजूनही वेटिंग लिस्टवरच आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातील नावांच्या चर्चेसाठी दिल्लीवरुन अजूनही शिवसेनेशी संपर्क साधण्यात आलेला नाही.
उद्या सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. केंद्रीय मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहेत.
शिवसेनेकडून कोण?
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी खासदार अनिल देसाई आणि खासदार आनंदराव अडसूळ यांची नावं चर्चेत आहेत. सध्या शिवसेनेचे अनंत गीते हे मोदींच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्रालय सांभाळत आहेत.
रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार येत्या रविवारी म्हणजेच 3 सप्टेंबरला होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसंच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेमंत्रीपद येण्याची चिन्हं आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच अनेक मंत्र्यांनी स्वत:हून राजीनामे सादर केले आहेत.