मुंबई:  शिवसेनेचे चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाड आता रस्तेमार्गे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. गायकवाड हे काल राजधानी एक्सप्रेसनं दिल्लीला निघाल्याची चर्चा होती.

रवींद्र गायकवाड यांचं नाव राजधानी एक्स्प्रेसच्या रिझर्व्हेशनच्या यादीतही होतं. मात्र आज ते बाय रोड दिल्लीसाठी निघाले आहेत. ते उद्या लोकसभेत हजर राहतील अशी चर्चा आहे.

एअर इंडियाच्या हैदराबाद ते दिल्ली या विमानाचं तिकिट त्यांनी बूक केलं होतं. सोबतच मुंबई ते दिल्ली असं तिकिटही गायकवाडांनी बूक केलं होतं. मात्र दोन्ही तिकिटं एअर इंडियानं रद्द केली आहेत.

एअर इंडियाने खासदार रवींद्र गायकवाड यांचं तिकीट रद्द करण्याची ही दुसरी वेळ आहे. अधिकाऱ्याला मारहाण केल्याने एअर इंडियाने खासदार गायकवाड यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं होतं. त्यानंतर त्यांचं तिकीटही रद्द केलं होतं.

संसदेत विमान कंपन्यांविरोधात हक्कभंग दाखल केल्यानंतरही एअर इंडियाच्या भूमिकेत कोणतीही नरमाई आलेली नाही. एअर इंडियासह सात एअरलाईन्स कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे.

काय आहे प्रकरण?

उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला.

VIDEO: खा. रवींद्र गायकवाडांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद

विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे.

… म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड

‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही,  मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो,  अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.

संबंधित बातम्या :


ताई म्हणून सांगते, विमानबंदी प्रश्नी सलोख्याने तोडगा काढा : महाजन


प्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बाजूने


मीडियाशी बोलू नका, उद्धव ठाकरेंकडून खा. गायकवाड यांना समज


रवींद्र गायकवाड उस्मानाबादला आलेच नाहीत, ‘ते’ दोघेही…


कपिल शर्मावर बंदी नाही, मग खा. गायकवाडांवर का?: खा. अडसूळ


खा. रवींद्र गायकवाड गायबच, शिवसैनिकांची उस्मानाबाद बंदची हाक


खा. रवींद्र गायकवाड यांचं लेखी स्पष्टीकरण


गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार


लोकप्रतिनिधींनी पटकन हिंसक होणं अयोग्य : एकनाथ शिंदे


पुन्हा त्याच विमानाने जाणार, एअर इंडियाने अडवून दाखवावं : गायकवाड


एअर इंडियाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात तक्रार


… म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड


शिवसेनेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याचा पुतळा जाळला