नवी दिल्ली : भारत पहिल्यांदाच वीज आयात करणाऱ्या देशातून वीज निर्यात करणारा देश म्हणून उदयास आला आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने क्रॉस-बॉर्डर ट्रेड ऑफ इलेक्ट्रिसिटीबाबत माहिती दिली आहे.
2016-17 या आर्थिक वर्षात भारताने नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेशला 5 हजार 798 मिलियन युनिट वीज उपलब्ध करुन दिली. तर भूतानमधून 5 हजार 585 मिलियन युनिट वीज आयात केली. याप्रमाणे भारताने एकूण 213 मिलियन युनिट वीज निर्यात केली आहे.
नेपाळ आणि बांगलादेशमध्ये वीज निर्यात करण्याच्या प्रमाणात गेल्या दोन वर्षात अनुक्रमे 2.5 टक्के आणि 2.8 टक्के वाढ झाली आहे.
विजेचा क्रॉस बॉर्डर व्यापार सुरु झाल्यापासूनच भारत भूतानकडून वीज आयात करतो. 80 च्या दशकापासूनच भूतानकडून भारताला 5 हजार ते 5 हजार 500 मिलियन युनिट वीज निर्यात केली जाते.
नेपाळला बिहार आणि उत्तर प्रदेशमधून वीज पुरवठा निर्यात केला जातो. भारताकडून नेपाळला 190 मेगाव्हॅट वीज निर्यात केली जात होती. मात्र आता हे प्रमाण 145 मेगाव्हॅटने वाढलं आहे. तर येत्या काळातही हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.