मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील एका शिवसेना नेत्याने धर्मांतर करुन इस्लाम स्वीकारला आहे. शिवसैनिक सुशील कुमार आता मोहम्मद अब्दुल समाद या नावाने ओळखले जाणार आहेत.


 
अमर उजाला वृत्तपत्राच्या बातमीनुसार सुशील कुमार जैन यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. मात्र या निर्णयामुळे जैन समुदाय, महापालिका प्रशासन आणि महसूल विभागामध्ये तीव्र नाराजी आहे. 15 फेब्रुवारी रोजी स्वतःच्या मर्जीने, कुठल्याही दडपणाशिवाय धर्मांतर केल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं आहे.

 
काही काळापासून सुशील कुमार जैन हे नाराज होते, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. समाद यांच्या धर्मपरिवर्तनाचे मुझफ्फरनगरमधल्या खटौलीमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत.