लखनऊ : उत्तर प्रदेशमधील योगी सरकार अयोध्येतील शरयू तिरी 100 फुटी प्रभू श्री रामांची मूर्ती उभारण्याच्या तयारीत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला, तर मूर्तीच्या भात्यासाठी चांदीचे बाण देण्याची तयारी शिया वक्फ बोर्डाने दर्शवली आहे.
शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी सरकारच्या मूर्ती उभारणीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. विशेष म्हणजे, अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर उभारण्यासाठी जमीन देण्यासही शिया वक्फ बोर्डाने तयारी दर्शवली आहे.
रिझवी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "अयोध्येत जर प्रभू श्री रामांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, तर शिया वक्फ बोर्डाकडून मूर्तीच्या भात्यासाठी 10 चांदीचे बाण भेट म्हणून देऊ."
अयोध्या हे एक सांस्कृतिक शहर आहे. सरकारकडून शहराच्या विकासासाठी जे निर्णय घेतले जात आहेत, ते अभिनंदन करण्याजोगे असल्याचंही त्यांनी या पत्राद्वारे म्हटलं आहे.
दरम्यान, वसीम रिझवी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. पण उत्तर प्रदेशमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासून, शिया वक्फ बोर्ड अचानक रामभक्त झाले आहे.
विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशचे अल्पसंख्याक मंत्री मोहसिन रझा यांचे आणि रिझवी यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. पण तरीही रिझवी यांनी आपलं वक्फ बोर्डाचं अध्यक्षपद टीकवण्यात यश मिळवलं आहे.
संबंधित बातम्या
योगी सरकार शरयू तिरी 100 फुटी श्रीरामाची भव्य मूर्ती उभारणार?
अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या भात्यात शिया वक्फ बोर्डाचे चांदीचे बाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2017 10:27 PM (IST)
उत्तर प्रदेशमधील योगी सरकार अयोध्येतील शरयू तिरी 100 फुटी प्रभू श्री रामांची मूर्ती उभारण्याच्या तयारीत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला, तर मूर्तीच्या भात्यासाठी चांदीचे बाण देण्याची तयारी शिया वक्फ बोर्डाने दर्शवली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -