नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रसतर्फे शीला दीक्षित यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे दीक्षित प्रबळ दावेदार मानल्या जात असतानाच त्यांचे सुपु्त्र संदीप दीक्षित बंडखोरीच्या पवित्र्यात आहे.

 
आपल्या ब्लॉगद्वारे संदीप दीक्षित यांनी काँग्रेसच्या हायकमांडवर शरसंधान साधलं आहे. 'माझा स्वभाव बंडखोर वृत्तीचा आहे आणि असं नेतृत्त्व काँग्रेसमध्ये स्वीकारलं जात नाही, असं मला सांगण्यात आलंय. मग मी काय करु', असा सवाल संदीप दीक्षित यांनी विचारला आहे.

 
याच ब्लॉगमधून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अजय माकन यांच्यावर संदिप दीक्षित यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 
भाजप आणि आप हे दोन पर्याय उपलब्ध असल्याचंही दीक्षित यांनी नमूद केलं आहे. आपमधील नेतृत्वाने शीला दीक्षित यांच्यावर चुकीचे आरोप करत निशाणा साधला. त्यामुळे आत्मसन्मान शाबुत राहील अशा पर्यायाच्या मी शोधात आहे.

 
दुसरीकडे, भाजपविषयी बोलताना या पक्षात एकाच व्यक्तीचं पूजन होत असल्याचं ते म्हणाले. मी मात्र लोकशाहीवर विश्वास ठेवतो, असं त्यांचं म्हणणं आहे.