मुंबई : काश्मीरमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या पेलेट गनच्या वापराचा पाकिस्तानमधील एका संघटनेने निषेध नोंदवला आहे. भारतीय सेलिब्रिटींच्या फोटोशी छेडछाड करत या संघटनेने हे कॅम्पेन चालवलं आहे.  नेव्हर फरगेट पाकिस्तान या पाकिस्तानी संघटनेने भारतीय सेलिब्रिटींच्या मॉर्फ केलेल्या फोटोंची एक मालिकाच सुरू केली आहे. हे फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये सेलिब्रिटींचा चेहरा आणि डोळे पेलेट्सने जखमी दाखवलं आहेत.

 

या सेलिब्रिटींमध्ये विराट कोहली, अमिताभ बच्चन, शाहरूख खान, काजोल, हृतिक रोशनसोबत बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. काश्मिरमधील सद्यस्थितीवर पाकिस्तानातील नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर हे कॅम्पेन चालवले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ यांना याची माहिती देण्यात आल्यानंतर पाकिस्तान जम्मू-काश्मिरमधील लोकांना अतिरेकी होण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मिर खोऱ्यात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्याम भारतीय सैन्यदलाने पेलेट गनचा वापर केला होता. यात 45 लोकांचा मृत्यू झाला होता