शशी थरुर यांनी आपल्या फोटोला ‘डॉगी फिल्टर’ वापरुन ट्विटरवर पोस्ट करुन ट्रोलरना आव्हान दिलं आहे. पण या फोटोमुळे ते स्वत: अडचणीत आले आहेत. कारण शशी थरुर यांच्या या फोटोवर नेटिझन्सनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
'एआयबी' ग्रुपने आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन मोदींच्या फोटोला ‘डॉगी फिल्टर’ लावून शुक्रवारी तो फोट पोस्ट केला होता. पण या फोटोवर नेटिझन्सनी तीव्र आक्षेप नोंदवला. यानंतर एआयबीने हा फोटो टि्वटरवरून हटवला. मात्र, मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने याची गंभीर दखल घेत, शनिवारी 'एआयबी'विरोधात गुन्हा दाखल केला होता.
संबंधित बातम्या
एआयबीकडून मोदींच्या फोटोवर डॉग फिल्टर