पवार-मोदींची संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात 20 मिनिटे चर्चा
एबीपी माझा वेब टीम | 15 Mar 2017 04:13 PM (IST)
नवी दिल्ली : संसद भवनातल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये भेट झाली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. मात्र भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच संसदेत उपस्थित होते. संसदेच्या कामकाजानंतर पंतप्रधानांच्या संसदेतील कार्यालयात शरद पवारांनी मोदींची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपच्या निवडणुकीतील यशानंतर मोदीचं संसदेत भाजप खासदारांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं.