नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन टूल किट प्रकरणात आता सातवं नाव समोर आलं आहे. धालीवालची सहकारी अनिता लाल ही देखील आता पोलिसांच्या रडारवर आहेत. दिशा रवीच्या अटकेनंतर आता निकिता जॅकबवर अटकेची टांगती तलवार आहे. तर शंतनू मुळूकला ट्रान्झिट अॅडव्हान्स जामीन मिळाला आहे. याशिवाय पुनीत आणि फ्रेडरिकही पोलिसांच्या रडारवर आहेत. या सर्वांव्यतिरिक्त खलिस्तानचा अतिरेकी भजनसिंग भिंडरदेखील यामध्ये असल्याचं दिसत आहे.
कोण आहे अनिता लाल?
कॅनडामधील व्हँकूव्हरमध्ये राहणारी अनिता लाल ही धालीवालची सहकारी आहे. व्यवसायापासून ते खालिस्तानी अजेंडापर्यंत प्रत्येक गोष्टीत ती भागीदार असल्याचे मानले जाते. अनिता लाल खलिस्तानी समर्थक पोएटीक जस्टिस सोसायटीची सह-संस्थापक आहेत. तसेच ती या संस्थेचे कार्यकारी संचालक देखील आहेत.
टूल किट प्रकरण : संशयित शंतनू मुळूकच्या बीडमधील घरी दिल्ली पोलिसाची रेड
अनिता लाल खलिस्तान समर्थक धालीवाल याची मुख्य सल्लागार असल्याचं बोललं जात आहे आहेत. अनिता लालच्या ट्विटर अकाऊंटवर नजर टाकल्यास ती शेतकरी आंदोलन आणि भारताविरूद्ध सुरु असलेले हॅशटॅग सतत वापरत होती. धालीवालसोबत टूलकिटबाबत झालेल्या झूम मिटिंगमधअये अनिता लाल सहभागी असल्याची माहिती समोर येत आहेत. दिल्ली पोलीस याबाबत सखोल चौकशी करत आहेत.
दिशा रवीच्या अटकेनंतर चर्चेत आलेले टूलकिट काय आहे? ते कशा प्रकारे काम करतं?
काय आहे टूलकिट ?
टूलकिट हे एक डिजिटल माध्यम वा हत्यार आहे, ज्याचा वापर करुन कोणत्याही आंदोलनाला हवा कशी देता येईल किंवा त्या आंदोलनाचा विस्तार कसा करता येईल याची माहिती देण्यात येते. अमेरिकेतील 'ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर' या आंदोलनात अशा प्रकारचं टूलकिट पहिल्यांदा चर्चेत आलं होतं. या माध्यमातून आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. टूलकिटच्या माध्यमातून आंदोलन कसे करावे, त्याचा विस्तार टप्प्याटप्प्याने कसा करावा याची सखोल माहिती देण्यात येते.
ग्रेटा थनबर्गने अपलोड केलेल्या टूलकिटबाबत दिल्लीत गुन्हा दाखल
आंदोलनादरम्यान पोलीस कारवाई झाली तर काय करावं, किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकताना कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती या टूलकिटच्या माध्यमातून देण्यात येते. तसेच आंदोलन करताना कोणतीही अडचण आली तर कोणाशी संपर्क साधावा याचीही माहिती या टूलकिटच्या माध्यमातून देण्यात येते.