सेवा शुल्क देण्याचा निर्णय पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खर्च कमी होणार आहे.
‘हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये किती सेवा शुल्क द्यायचे, हे ग्राहकच ठरवतील. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना सेवा शुल्क ठरवण्याचा अधिकार आता असणार नाही,’ असे अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केले आहे.
‘सेवा शुल्क बंधनकारक नसल्याचा आणि पूर्णपणे ऐच्छिक असल्याचा निर्णय सर्व राज्य सरकारांना कळवण्यात आला आहे. यावर सर्व राज्यांनी योग्य पावले उचलावीत,’ असेही पासवान यांनी म्हटले आहे.