7th September In History : भारताचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या पृष्ठभागावर 23 ऑगस्ट 2023 रोजी सुरक्षितपणे उतरलं. ही मोहिम चांद्रयान-2 (Chandrayaan-2) चा पुढचा टप्पा होता. कारण, चांद्रयान-2 मोहिम अयशस्वी झाली होती. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याआधीच चांद्रयान-2 चा इस्रोशी संपर्क तुटला होता. 2018 मध्ये आजच्याच दिवशी इस्रोने चांद्रयान-2 शी संपर्क तुटल्याचं जाहीर केलं होतं. पण, त्यानंतरही भारताने हार न मानता चार वर्ष कठोर परिश्रम घेतले आणि भारत अखेर चंद्रावर पोहोचला. आज नीरजा भानोत हिचा जन्मदिन आहे.  प्रवाशांची सुटका करताना जीव गमावणारी फ्लाइट अटेंडंट नीरजा भानोत हिला मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं. यासोबतच आज अभिनेत्री राधिका आपटे हिचाही वाढदिवस आहे. आज 7 सप्टेंबर रोजी देशात आणि जगातच्या इतिहासात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.


2019 : इस्रोचा चांद्रयान-2 शी संपर्क तुटला


चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या चांद्रयान-2 चांद्र लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला. 


1963 : फ्लाइट अटेंडंट नीरजा भानोत जन्मदिन


अशोक चक्र विजेती फ्लाइट अटेंडंट नीरजा भानोत हिची आज जन्म दिवस आहे. नीरजा भानोतचा जन्म 7 सप्टेंबर 1963 मध्ये झाला. दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या भारतीय विमानातील प्रवाशांना वाचवण्यासाठी फ्लाइट अटेंडंट नीरजा भानोत 5 सप्टेंबर 1986 रोजी, तिच्या 23 व्या वाढदिवसाच्या फक्त 2 दिवस आधी शहीद झाली. 5 सप्टेंबर 1986 रोजी मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेल्या PAN AM-73 विमानाचं पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी कराचीत अपहरण केलं होतं. पॅन ॲम फ्लाइट 73 या विमानातील प्रवाशांचे संरक्षण करताना दहशतवाद्यांनी तिला गोळी मारली. 


1985 : अभिनेत्री राधिका आपटे वाढदिवस


अभिनेत्री राधिका आपटे हिचा आज वाढदिवस आहे. राधिका आपटे हिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यासोबत तिने तमिळ, मराठी, मल्याळम, तेलुगू, बंगाली आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.


1888 : पहिल्या बाळाला इनक्यूबेटरमध्ये ठेवलं


7 सप्टेंबर 1888 रोजी, एडिथ एलेनॉर मॅक्लीन या चिमुकलीला पहिल्यांदा इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिला न्यूयॉर्कच्या वॉर्ड्स आयलंड येथील स्टेट इमिग्रंट हॉस्पिटलमध्ये इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यात आलं होतं.


2004 : क्रिकेटपटू द्रविड वर्षातील सर्वोत्तम खेळाडू (Player of the Year) 


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दिला.


2002 : सेरेना विल्यम्सनं दुसरं यूएस विजेतेपद जिंकलं


सेरेना विल्यम्सने 2002 मध्ये दुसरी यूएस ओपन महिला टेनिस चॅम्पियनशिप जिंकली. सेरेनाने तिची मोठी बहीण व्हीनस विल्यम्सचा 6-4, 6-3 असा पराभव केला.


2016 : पंधराव्या पॅरालिम्पिकला सुरुवात


7 सप्टेंबर 2016 रोजी ब्राझीलमधील रिओ दी जानेरो येथे 15 व्या उन्हाळी पॅरालिम्पिक स्पर्धेची सुरुवात झाली.