मुंबई : शेअर बाजारात आज मोठी उसळी पाहायला मिळाली. शेअर बाजार सोमवारी उघडताच सेन्सेक्स 1300 अंकांनी वधारला. सेन्सेक्स 39,125 अंकांवर तर निफ्टीनेही 11,650 चा आकडा पार केला.


शुक्रवारीही शेअर बाजारात मागील सारे रेकॉर्ड मोडले गेले होते. आयटीसी, एल अँड टी, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स आणि एम अँड एमच्या शेअर्सच्या दरात 5 ते 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


शुक्रवारी शेअर बाजारात 2280 अंकांनी वाढ होऊन 38,014 अंकांवर बंद झाला होता. एका दिवसातील ही सर्वात मोठी उसळी होती. निफ्टीतही 600 अंकांनी वाढ झाली होती.


बाजारातील या उसळीचा फायदा मोटोकॉर्प, मारुती, बजाज फायनान्स, इंडसइंड बँग आणि एचडीएफसी बँक यांच्या शेअर्सना फायदा झाला होता. या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत 8 ते 11 टक्क्यांनी वाढ झाली होती.



सरकारने घेतलेल्या काही अर्थसंबधीच्या निर्णयांमुळे बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी कॉर्पोरेट कर कपात जाहीर केली. याशिवाय कॅपिटल गेन टॅक्सही बंद करण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी केला होता.