नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. के. धवन यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं. धवन यांनी दिल्लीतील बी. एल. कपूर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

आर. के. धवन हे राज्यसभेचे माजी खासदार होते. तसेच, ते माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचे सचिव होते. इंदिरा गांधी यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू म्हणून आर. के. धवन ओळखले जात.

इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय असल्याने राजकारणात त्यांचे वजन होते. इंदिरा गांधी यांच्या सत्ताकाळात आर. के. धवन यांना देशातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात ताकदवान नेते मानले जाई.

इंदिरा गांधींचे हत्येच्या ते प्रत्यक्षदर्शी होते.

आर. के. धवन यांना काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.