नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे  वृद्धापकाळाने वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. प्रकृती खराब असल्याने त्यांना मोतीलाल वोरा यांना काल रात्री एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल केले. कॉंग्रेसचे खजिनदार असलेले मोतीलाल वोरा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि उत्तरप्रदेश राज्यपाल होते.


मोतीलाल वोरा हे गांधी परिवाराच्या जवळ होते. 2018 साली वाढत्या वयाचे कारण देत राहुल गांधी यांनी खजीनदार पदाची जबाबदारी अहमद पटेल यांना दिली. अहमद पटेल यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले. वोरा यांच्या निधनामुळे कॉंग्रेसला मोठं नुकसान झालं आहे.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, राहुल गांधी, प्रियंका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वोरा यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


राहुल गांधी यांनी ट्विट करत वोरा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले, वोराजी अद्भूत व्यक्ती होते. त्यांची खूप आठवण येईल. त्यांच्या कुटुंबियांना,चाहत्यांना माझं प्रेम आणि संवेदना."