कोलकाता : कोलकात्यातील जलपाईगुडी येथील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पश्चिम बंगालमधल्या एका वनरक्षकानं अजगरासोबत सेल्फी घेण्याचं धाडस केलं. पण या वनरक्षकाचा हा फाजिल आत्मविश्वास त्याला चांगलाच भोवला. अखेरीस इतर गावकऱ्यांच्या मदतीने अजगराच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली.
हा अजगर स्थानिकांच्या बकऱ्या किंवा इतर प्राण्यांना गिळून फस्त करायचा. यामुळे गावात दहशतीचं वातावरण होतं. अजगराच्या दहशतीखाली असलेल्या गावकऱ्यांनी त्याला पकडून जंगलात सोडण्याची विनंती वन अधिकाऱ्याला केली.
अजगराला पकडण्यासाठी वनरक्षक गावात पोहोचला. त्याने अजगराला पकडलं. पकडलेल्या अजगराला सोडून न देता वनरक्षकानं तो गळ्यात धरला. सेल्फी घेण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली.
गळ्याभोवती असलेल्या अजगरानं आपली पकड अधिक मजबूत करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या वनरक्षकाच्या मदतीला सुदैवाने एक वनअधिकारी धावून आला आणि त्यानं या वनरक्षकाचे वाचवले.
सेल्फीसाठी गळ्यात घातलेल्या अजगराने फास आवळला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jun 2018 03:12 PM (IST)
पश्चिम बंगालमधल्या एका वनरक्षकानं अजगरासोबत सेल्फी घेण्याचं धाडस केलं. पण या वनरक्षकाचा हा फाजिल आत्मविश्वास त्याला चांगलाच भोवला. अखेरीस इतर गावकऱ्यांच्या मदतीने अजगराच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -