मुंबई : पाकिस्तानी (Pakistan) सीमा हैदर (Seema Haider) सचिनच्या (Sachin Meena) प्रेमासाठी भारतात पळून आल्यापासून कोणत्या न, कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत आहे. सीमा हैदर (Pakistani Seema Haider) आणि सचिन मीना यांच्या प्रेमकहाणीची (Seema-Sachin Love Story) चर्चा आहे. आता सोशल मीडियावर सीमाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सीमा मायदेश पाकिस्तानात परतणार असल्याचं बोलत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियार चांगलाच व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर एका व्हिडीओमध्ये सचिनच्या वडिलांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करताना सीमा दिसत आहे. पण, या व्हिडीओमागचं सत्य जाणून घ्या.
सीमा हैदर पाकिस्तानात मायदेशी परतणार?
सध्या 'सीमा हैदर'चा एक व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सचिनचं प्रेम खोटं असल्याचं सांगत सीमा पाकिस्तानात जाणार असल्याचं बोलत आहे. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण अवाक झाला आहे.
सीमाने व्हिडीओमध्ये काय म्हटलं?
सोशल मीडियावर व्हायरल एक व्हिडीओमध्ये सीमा हैदर म्हणते, 'मी सामान बांधलं आहे आणि परत जाण्याची तयारी केली आहे. मी पाकिस्तानात परत जात आहे. सचिन खोटं प्रेम करेल हे मला कधीच वाटलं नव्हतं. सुरुवातीला मला समजलं नाही की, माझे आई-वडील आणि हैदर काय सांगत आहेत. ते म्हणाले होते की, त्याला (सचिन) फक्त तुझे पैसे हवे आहेत. आणखी एका व्हिडीओमध्ये सीमा पती सचिन मीना आता तिला मारहाण करत असल्याचा आरोपही केला आहे.
काय आहे व्हायरल व्हिडीओचं सत्य?
मीडिया रिपोर्टनुसार, अनेक व्हिडीओंची तपासणी केली असता, ते सर्व बनावट असल्याचं आढळून आलं आहे. सीमाचा व्हायरल व्हिडीओ पहिल्यांदा पाहता तुमचीही फसवणूक होऊ शकते. सीमा हैदरची लोकप्रियता पाहता सोशल मीडियावर तिच्या नावाची अनेक बनावट खाती तयार करण्यात आल्याचं समोर येत आहे. सीमा हैदरचं नाव आणि फोटो वापररून अनेक बनावट खातीही तयार करण्यात आली आहेत. एआय टूल्सचा वापर करून डीप फेक व्हिडीओ तयार केले आहेत. अनेक लोक सीमाच्या व्हिडीओंच्या मदतीने लाइक्स आणि सब्सक्राइबर वाढवण्यासाठी असे बनावट व्हिडीओ बनवत आहेत. त्यामुळे अशा व्हायरल व्हिडीओंवर विश्वास ठेवण्यापूर्वी तो व्हिडीओ बनावट आहे की नाही हे काळजीपूर्वक तपासा.
महत्वाच्या इतर बातम्या :