Sugar Seized : भारत आणि बांगलादेशच्या ( India and Bangladesh) सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी 120 क्विंटल साखर जप्त (sugar seized) केली आहे. देशातून साखरेची निर्यात बंद असताना देखील साखरेची बांगलादेशात तस्करी होत असल्याचे उघड झाला आहे. दरम्यान, आता भारत-बांगलादेशच्या सीमेवर जप्त केलेली साखर नेमकी कोणाची? असा सवाल उपस्थित केला जातोय.




सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी भारत-बांगलादेश सीमेवर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी पात्रात साखरेच्या पोत्यांनी भरलेली बोट जप्त केली आहे. 120 क्विंटल एवढी साखर जप्त करण्यात आली आहे. बीएसएफ गुहाटीने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. एक डिसेंबर पासून 11 डिसेंबरच्या कालावधीत तिसऱ्यांदा तस्करीचा हा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


इथेनॉल निर्मिती बंदीवरून अजित पवारांचं अमित शाहांना पत्र, साखर कारखान्यांची 35 हजार कोटींची गुंतवणूक धोक्यात येण्याची भीती व्यक्त