Investment: करोडपती (Millionaire) होण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. परंतू, करोडपती होण्यासाठी कुठे आणि किती गुंतवणूक (investing) करावी हे अनेक लोकांना माहिती नसते. आजकाल, गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. तुम्ही दररोज थोडी थोडी पैशांची बचत करुन या रकमेचे रुपांतर मोठ्या गुंतवणुकीत करु शकता. जर तुम्ही फक्त चहा (Tea) आणि सिगारेटची (Cigarette) सवय सोडली आणि हे पैसे गुंतवले तर तुम्ही काही वर्षात करोडपती होऊ शकता. तुम्ही कसे करोडपती व्हाल याबाबतची माहिती पाहुयात...


थोडीशी गुंतवणूक करा मोठे भांडवलं उभं करा


तुम्हालाही करोडपती व्हायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. आजच्या काळात, गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत, जिथे थोडीशी गुंतवणूक करुनही तुम्ही हळूहळू खूप मोठे भांडवल तयार करु शकता. म्युच्युअल एसआयपी हा देखील असाच एक पर्याय आहे. जिथे तुम्ही फक्त चहा आणि सिगारेटसाठी जे पैसे खर्च करता ते पैसे गुंतवले तरी तुम्ही करोडपती होऊ शकता.


नेमकं गणित कसं?


समजा एखादी व्यक्ती दिवसातून 3 सिगारेट ओढते. ज्यावर त्याचा सरासरी खर्च 60 रुपये आहे. याशिवाय ऑफिसच्या वेळेत तुम्ही 3 ते 4 कप चहा पीत असाल तरी तुम्हाला सरासरी 40 रुपये खर्च करता. दोन्ही पैसे एकत्र केले तर रोजचा चहा आणि सिगारेटवरील खर्च 100 रुपये होईल. म्हणजेच एका महिन्यात गुंतवलेली रक्कम सुमारे 3,000 रुपये असेल. तुम्ही जर हे पैसे वाचवले तर गुंतवणूकदार सहजपणे करोडपती होऊ शकतो.


30 वर्षांत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी निर्माण होईल


गुंतवणुकीच्या संदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर रोजचा चहा आणि सिगारेटचा पैसा गुंतवले तर 30 वर्षांत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी निर्माण होईल. जर एखाद्याने वयाच्या 30 व्या वर्षी नोकरी सुरु केली आणि त्यानंतर दरमहा 3000 ची SIP सुरू केली तर 30 वर्षात एकूण  10.80 लाख गुंतवले जातील. इक्विटी म्युच्युअल फंडाचा सरासरी दीर्घकालीन परतावा 12 टक्के आहे. या परताव्यावरुन पाहिल्यास, ही गुंतवणूक निवृत्तीनंतर 1,05,89,741 रुपये होईल. या कालावधीत 95,09,741 रुपये फक्त व्याज म्हणून तुम्हाला मिळतील. त्यामुळं तुम्ही जर दररोज चहा आणि सिगारेट घेतली नाही आणि त्याचे पैसे जर वाचवले तर सहजपणे करोडपती होऊ शकता.


महत्त्वाच्या बातम्या:


investment : श्रीलंकेनं जेवढ्या धावा केल्या फक्त तेवढेच पैसे जमा करा, करोडपती व्हा; असं करा नियोजन