PM Modi Security Breach: कर्नाटकातील (Karnataka) हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचे मोठे प्रकरण समोर आले आहे. येथे पंतप्रधान मोदींच्या (Pm Narendra Modi) रोड शो दरम्यान एक तरुण अचानक त्यांच्याकडे धावत आला आणि त्याच्या कारपर्यंत पोहोचला. या तरुणाला पंतप्रधानांना फुलांचा हार घालायचा होता. त्यासाठी त्याने कोणताही विचार न करता एसपीजीचा सुरक्षा कवच तोडत पंतप्रधान मोदींपर्यंत (Pm Narendra Modi) पोहोचला. हे पाहताच एसपीजी कमांडो धावत आले आणि त्यांनी तरुणाला पंतप्रधान मोदींच्या (Pm Narendra Modi) कारपासून दूर नेले.
PM Modi Security Breach: नेमकं काय घडलं?
पंतप्रधान मोदी (Pm Narendra Modi) कर्नाटकातील (Karnataka) हुबळी येथे त्यांच्या कारमधून रोड शोमध्ये भाग घेत होते. यावेळी पंतप्रधान कारचे दार उघडून लोकांचे अभिवादन स्वीकारत होते. पंतप्रधान मोदींसोबत (Pm Narendra Modi) एसपीजीचा सुरक्षा कवच होतं. इतकी कडक सुरक्षा असतानाही एक तरुण अचानक त्यांच्या गाडीकडे धाव घेत पुष्पहार घेऊन पंतप्रधानांपर्यंत पोहोचतो. यानंतर त्यांना हार घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र एसपीजी कमांडो त्याला पंतप्रधानांपर्यंत (Pm Narendra Modi) पोहोचू देत नाहीत.
PM Modi Security Breach: भाजपचं मिशन कर्नाटक
कर्नाटकात (Karnataka) विधानसभेच्या निवडणुका होणार असून, त्यादृष्टीने भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजप गेल्या अनेक दिवसांपासून मिशन कर्नाटकमध्ये व्यस्त आहे. सत्ताबदल होऊ नये आणि राज्यात पुन्हा एकदा भाजपचेच सरकार यावे, असा पक्षाचा प्रयत्न आहे. हे पाहता पंतप्रधान (Pm Narendra Modi) स्वतः मिशन कर्नाटकमध्ये (Karnataka) व्यस्त आहेत. त्याअंतर्गत हुबळीमध्ये हा रोड शो केला जात आहे. रोड शो दरम्यान पंतप्रधानांच्या (Pm Narendra Modi) स्वागतासाठी शेकडो लोक रस्त्याच्या कडेला पोहोचले होते. लोक पंतप्रधान मोदींचे फुलांनी स्वागत करत होते, तसेच पंतप्रधान मोदी (Pm Narendra Modi) देखील कारमधून उतरून लोकांचे अभिवादन स्वीकारताना दिसत होते.