हरियाणा : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख  बाबा राम रहीम ज्याला स्वर्ग मानायचा, जिथं त्याच्या मर्जीनं एक गोष्ट हलायची नाही त्याच बाबा राम रहीमच्या डेऱ्यावर आज हरियाणा पोलीस आणि जवानांनी डेरा घातला आहे. अर्थात बाबा राम रहीमचा डेरा सील करुन त्याची झाडाझडती सध्या सुरु आहे.


आतापर्यंतच्या झाडाझडती बाबा राम रहीमचं स्वतःचं चलन, लॅपटॉप आणि काही रोकड आढळून आली आहे. या डेऱ्यामध्ये दिलं जाणारं अवैध शस्त्रं प्रशिक्षण, अवैध धंदे अशा अनेक गोष्टी लोकांपुढे आल्या आहेत.

हरियाणातल्या सिरसामधला हा डेरा ज्याला आपण आश्रम म्हणतो ते एक प्रकारे बाबा राम रहीमचं मुख्यालय होतं. तब्बल 700 एकरमध्ये पसरलेला हा डेरा अनेक ऐशोआरामाच्या साधनांनी सज्ज आहे.

राम रहीमचं स्वत:चं चलन सापडलं  

पोलिसांनी आणि जवानांनी छापा टाकलानंतर बऱ्याच धक्कादायक गोष्टी आता समोर आल्या आहेत. हद्द म्हणजे या डेऱ्यात राम रहीमनचं स्वत:चं वेगळं चलन सुरु केलं होतं. 1,2,5 आणि 10 रुपये किंमतीचं वेगळं चलन इथं सापडलं आहे. म्हणजे तुम्हाला डेऱ्यात काही खरेदी करायचं असेल तर भारतीय चलन देऊन राम रहीमचं चलन घ्यावं लागायचं.

1500 बूट आणि 3000 डिझायनर कपडे

या झडतीमध्ये बऱ्याच गोष्टी सापडल्या आहेत. यामध्ये पोलिसांना राम रहीमच्या वॉर्डरोबमध्ये 1500 बूट आणि 3000 डिझायनर कपडे सापडले आहेत.

आलिशान फर्निचर, वॉर्डरोब आणि पलंग

डेऱ्यामध्ये आलिशान फर्निचर, वॉर्डरोब आणि पलंगही सापडले आहेत. या डेऱ्यात बऱ्याच महागडा गोष्टी सापडत आहेत.

संबंधित बातम्या :

बलात्कारी राम रहीमच्या डेऱ्याची पोलिसांकडून झाडाझडती