नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Cabinet Decision) यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनुसूचित जमातींच्या (ST) यादीत काही समुदायांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्तीसगढ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तमिलनाडू या राज्यातील काही समुदायांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. 


केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज या संबंधित माहिती दिली. अर्जुन मुंडा यांनी सांगितलं की, छत्तीसगडमधील 12 समुदाय, कर्नाटकमधील एक, हिमाचलमधील एक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधील एकूण 13 जिल्ह्यांतील गोंड समुदायाचा अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 


गोंड समुदायाचा या आधी अनुसूचित जातींच्या यादीत समावेश होता. त्यामध्ये आता बदल करण्यात आलं असून या समुदायाचा आता अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गोंड जमातीच्या पाच उपजमातींचा म्हणजे धुरिया, नायक, ओझा, पठारी आणि राजगोंडा या जमातींचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 


 






छत्तीसगडमधील 12 समुदायांचा समावेश 


आज घेण्यात आलेल्या या निर्णयामध्ये छत्तीसगडमधील सर्वाधिक म्हणजे 12 समूदायांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये भारीया, भूंईया, भूयां, पंडो, धनुहार, धनुवार, गदबा, गोंड, कोंद, कोडाकू, नगेसिया, किसान, धनगड, धांगड, सौंरा, बिंझिया या समुदायाचा समावेश आहे. 


हिमाचलमधील हट्टी समुदायाचा या यादीत समावेश करण्यात आला असून त्याचसोबत तामिळनाडूतील कुरुविक्करन या समुदायाचाही समावेश आहे. कर्नाटकातील बेट्टा कुरुबा आणि उत्तर प्रदेशातील भदोही आणि 13 जिल्ह्यांतील गोंड समुदायाचा या मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच गोंड जमातीच्या पाच उपजमातींचा म्हणजे धुरिया, नायक, ओझा, पठारी आणि राजगोंडा या जमातींचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :