नवी दिल्ली: आर्थिक राजधानी मुंबई आणि देशाची राजधानी दिल्लीतल्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांवरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघाडणी केली.

मुंबई आणि दिल्लीमध्ये नेमके किती खड्डे आहेत, याची माहिती न्यायालयात सादर करा, असे आदेश न्यायलयाने सरकारला दिले. असे किती खड्डे आहेत, की संबंधीत यंत्रणेला ते मोजण्यासाठी इतका वेळ लागतोय, असं म्हणत न्यायालयाने सरकारला सुनावलं.

याला उत्तर देताना, लवकरात लवकर न्यायालयात माहिती सादर करु असं सरकारनं उत्तर दिलं. शिवाय 2016 या वर्षात रस्ते अपघातामध्ये एकूण 1 लाख 60 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातग्रस्तांना सरकाकड़ून मदत देण्यासंबंधात काय उपाययोजना करण्यात आल्यात, असा सवालही न्यायलायाने विचारला.

रस्ते सुरक्षासंबंधी याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं.

जीवघेणे खड्डे

देशभरात रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. देशातील 51 टक्के 18 ते 30 वयोगटातील तरुणांचा मृत्यू रस्ते अपघात झाला.

मुंबईत तर खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण खूपच वाढलं आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये खड्ड्यामुळे बाईक घसरुन महिला खाली पडली. त्याचवेळी मागून येणाऱ्या बसने तिला चिरडल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

मुंबईत खड्डे किती? मुख्यमंत्री म्हणतात...

मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. बहुतांश भागात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे मुंबईत रस्ता नावाची संकल्पना अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. सध्या मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची सरासरी संख्या लाखोंच्या घरात नक्कीच आहे.  मात्र अद्यापर्यंत 4 हजार 400 खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत केला. त्यानंतर एबीपी माझानं मुंबईतल्या रस्त्यांची पडताळणी सुरु केली आहे. खड्ड्यांमध्ये थोडे थोडे रस्ते शोधत चालणारे आणि वाहन चालवणारे मुंबईकर यातून कसाबसा मार्ग काढताना आम्हाला दिसलेत.

संबंधित बातम्या 

मुंबई : मुंबईतील खड्डेयुक्त रस्त्यांना जबाबदार कोण, 'माझा'चा ग्राऊंड रिपोर्ट 

खड्ड्यांपासून जीवाला धोका, तरुणाची पोलीस संरक्षणाची मागणी