पणजी: विक्रमी विदेश दौऱ्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करा अशी मागणी काँग्रेसने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 वर्षात 41 विदेश वाऱ्या करत, 52 देशांना भेटी देऊन विक्रम रचला आहे. त्यामुळे त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केली.
गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी गिनीज बुककडे लेखी पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
काँग्रेसच्या बंगळूरु येथील हितचिंतक माहिती अधिकार कार्यकर्त्याने आरटीआय अंतर्गत मिळवलेल्या माहितीच्या आधारे आमोणकर यांनी गिनीज बुकच्या लंडन येथील कार्यालयाला लेखी पत्र पाठवून मोदी यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लवकरात लवकर नोंदवावे अशी मागणी केली आहे.
आमोणकर यांनी आपल्या पत्रात मोदी यांनी 4 वर्षात 41 विदेश वाऱ्या करून 52 देशांना भेटी दिल्या असून, त्यासाठी 355 कोटी,30 लाख38 हजार 465 रुपये खर्च झाल्याचा उल्लेख केला आहे. मोदींच्या काळात रुपयाचे अवमूल्यन झाले असून मोदींची कामगिरी निराशाजनक असल्याचे देखील यावेळी ते म्हणाले.
'विक्रमी विदेश दौऱ्यांबद्दल मोदींची गिनीज बुकात नोंद करा'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2018 09:09 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 वर्षात 41 विदेश वाऱ्या करत, 52 देशांना भेटी देऊन विक्रम रचला आहे. त्यामुळे त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -