याआधी स्टेट बँकेनं खात्यातील किमान रकमेची मर्यादा हटवली होती. त्यामुळे शून्य रुपयांमध्येही बचत खातेधारकांना आपलं अकाऊंट वापरता येत होतं. मात्र एप्रिल महिन्यापासून स्टेच बँकेनं ही मर्यादा पुन्हा ठेवली आहे.
यात ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागानुसार किमान रकमेची मर्यादा ठेवण्यात आली आहे. दंडाची रक्कमही त्याच पटीत खात्यातून वळती केली जाणार आहे.
काय आहे स्टेट बँक बचत खात्याची किमान रक्कम?
ग्रामीण भाग 1000 रुपये
निमशहरी भाग 2000 रुपये
शहरी भाग 3000 रुपये
महानगर 5000 रुपये
ही किमान रक्कम खात्यात न बाळगल्यास खातेधारकांना दंडही भरावा लागणार आहे. हा दंड खात्यातून वळता केला जाईल.
काय असेल दंडाची रक्कम?
ग्रामीण
1000 रुपयांच्या खाली बँक खात्यातील शिल्लक आल्यास दंड भरावा लागणार आहे.
500 ते 1000 शिल्लक 20 रुपयांचा दंड
250 ते 500 शिल्लक 30 रुपयांचा दंड
0 ते 250 शिल्लक 50 रुपयांचा दंड
निम शहरी
किमान मर्यादा 2000
दंडाची रक्कम
1000 ते 2000 शिल्लक 25 रुपयांचा दंड
500 ते 1000 शिल्लक 50 रुपयांचा दंड
0 ते 499 शिल्लक 75 रुपयांचा दंड
शहरी
किमान मर्यादा 3000
दंडाची रक्कम
1500 ते 3000 शिल्लक 40 रुपयांचा दंड
750 ते 1500 शिल्लक 60 रुपयांचा दंड
0 ते 749 शिल्लक 80 रुपयांचा दंड
महानगरीय भाग
किमान मर्यादा 5000
दंडाची रक्कम
2500 ते 5000 शिल्लक 50 रुपयांचा दंड
1250 ते 2500 शिल्लक 75 रुपयांचा दंड
0 ते 1249 शिल्लक 100 रुपयांचा दंड