मुंबई : जर तुमचे स्टेट बँकेत ऑफ इंडियामध्ये अकाऊंट असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एसबीआयच्या एटीएमधारकांवर याआधी एटीएममधून पैसे काढण्यावर विविध बंधने होती. परंतु आता हा त्रास दूर होऊ शकतो. आता एसबीआयचे एटीएमधारक अनलिमिटेड ट्रान्जॅक्शन करु शकतात. परंतु अनलिमिटेड ट्रान्झॅक्शनसाठी बँकेच्या काही अटींचे पालन करावे लागणार आहे.
काय आहे बँकेची अट?
अनलिमिटेड ट्रान्झॅक्शनसाठी बँक अकाऊंटमध्ये दर महिन्याला सरासरी एक लाख रुपये ठेवणे बंधनकारक आहे. त्यानंतरच ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुप (SBG) च्या एटीएम कार्डद्वारे अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन करु शकतात.
रिजर्व बँकेने एसबीआयला आदेश दिले आहेत की, त्यांनी त्यांच्या ग्राहकांना दर महिन्याला काही ठराविक वेळा फ्री आणि अनलिमिटेड ट्रान्झॅक्शनची सुविधा उपलब्ध करुन द्यायला हवी. यापूर्वी एसबीआयने एटीएममधून दिवसाला पैसे काढण्याची मर्यादा 40 हजारांवरुन 20 हजार इतकी घटवली होती.
सध्या एसबीआयचे ग्राहक दरमहा 8 वेळा एटीएम ट्रान्झॅक्शन करु शकतात. त्यापैकी पाच वेळा ग्राहकांना एसबीआयची एटीएम मशीन वापरावी लागते, तर तीन वेळा ग्राहक कोणत्याही बँकेच्या एटीएममधून ट्रान्झॅक्शन करु शकतात.
एसबीआयचं गिफ्ट; एटीएममधून आता कितीही वेळा पैसे काढा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Dec 2018 11:51 AM (IST)
एसबीआयचे खातेधारक आता अनलिमिटेड एटीएम ट्रान्झॅक्शन करु शकतात. परंतु ग्राहकांना बँकेच्या काही अटींचे पालन करावे लागणार आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -