SBI च्या व्याजदरात कपात, होम लोन-कार लोनधारकांना दिलासा
एबीपी माझा वेब टीम | 02 Nov 2017 09:21 PM (IST)
एसबीआयने गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजदरात 0.05 टक्क्यांची कपात केली आहे.
मुंबई : घर आणि वाहनकर्ज घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं व्याजदरात 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे. एसबीआयने गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजदरात 0.05 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे गृह कर्ज 8.35 टक्क्यांवरुन आता 8.30 टक्के झालं आहे. तर वाहन कर्जाचे व्याजदर हे 8.75 वरुन घट होऊन 8.70 टक्के इतके झाले आहेत. एसबीआयच्या गृहकर्जाचे व्याज दर हे सर्वात कमी असल्याचं एसबीआयने या कपातीनंतर जाहीर केलं आहे. नवीन व्याजदर 1 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. एसबीआयने व्याज दरात केलेल्या कपातीनंतर इतर बँकाही व्याज कपातीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे होमलोन आणि कार लोन घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.