मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्ज, वाहन कर्ज आणि शैक्षणिक कर्ज स्वस्त केलं आहे. मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे हा दर (एमसीएलआर) 9.20 टक्क्यांवरुन 9.15 टक्क्यांवर गेला आहे.
रिझर्व्ह बँकेने व्याजदारात कपात केल्यानंतर एसबीआयचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्याजदरात 0.25 बेसिस पॉइंटची कपात जाहीर केली होती.

होम लोन

पुरुषांसाठी : आधी 9.45 टक्के, आता 9.40 टक्के
महिलांसाठी : आधी 9.40 टक्के, आता 9.35 टक्के

कार लोन आणि एज्युकेशन लोनमध्ये 0.05 टक्क्यांची कपात

11.2 टक्क्यांऐवजी 11.15 टक्के दराने 7.5 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज
10.9 टक्क्यांऐवजी 10.85 टक्के दराने 7.5 लाखांवर शैक्षणिक कर्ज