नैनीताल : उत्तराखंडच्या जंगलात लागलेला वणवा आता हिमाचलपर्यंत पोहोचला आहे. शिमल्यातल्या 12 ठिकाणी हा वणवा पसरला असून, भारतीय हवाई दलानं वणवा विझवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

 

हवाई दलाच्या एमआय-17 आणि व्ही-5 हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं वणवा लागलेल्या परिसरात पाण्याचा वर्षाव केला जात असून, आतापर्यंत 70% आग नियंत्रणात आणल्याचा दावा एनडीआरएफनं केला आहे.

https://twitter.com/ANI_news/status/727132872595795970

लष्कर, एनडीआरएफ आणि हवाई दलाचे एकूण 6 हजार कर्मचारी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत या आगीत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.

 

दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत या जंगलांत वणवा पेटतच असतो. यंदा मात्र 2 फेब्रुवारीपासून लागलेला वणवा गेल्या 2 महिन्यांपासून धुमसतोच आहे.