मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियासोबतच्या सहयोगी बँकांची विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने, एकूण 1300 शाखांची नावं आणि IFSC कोड बदलले आहेत. ज्या शाखांची नावं आणि IFSC कोड बदलले आहेत, त्यात देशातील मेट्रो शहरांतील शाखांचा समावेश आहे.


बँकेचे प्रबंध संचालक प्रवीण गुप्ता यांनी सांगितलं की, "जुन्या काही सहयोगी बँकांचं नुकतच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण झालं. जेव्हा विलीनीकरणाची प्रक्रिया सुरु होती, त्यावेळी संबंधित शाखांचे IFSC कोड बदलले आहेत."

त्यांनी पुढं सांगितलं की, "संबंधित बँकांच्या खातेदारांना IFSC कोड बदलल्याची माहिती यापूर्वीच देण्यात आली आहे. तसेच, बँकेच्या अंतर्गत कामकाजातही बँकांचे जुने कोड, नव्या कोडद्वारे जोडण्यात आले आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती जुन्या कोडवरुन पैसे खात्यावर भरत असले, तर त्यांना कोणताही त्रास होणार नाही."

ज्या बँकांचे IFSC कोड बदलण्यात आले आहेत, त्यामध्ये मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरु, चेन्नई हैदराबाद, कोलकाता आणि लखनौ सारख्या मोठ्या शहरांमधील शाखांचा समावेश आहे.