स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठी सरकारी बँकांपैकी एक आहे. बँकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या बदलांमुळे आतापर्यंत ग्राहांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी म्हणजेच, वन टाइम पासवर्डी आवश्यकता असणार आहे. हा नियम लागू करण्यामागे एटीएमवर पडणारे दरोडे किंवा लूट यांवर आळा बसवण्याचा मानस आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच, 1 जानेवारी 2020 पासून दहा हजारांपेक्षा जास्त पैसे एटीएममधून काढताना ओटीपीची आवश्यकता असणार आहे. ही व्यवस्था बँकेच्या सर्व एटीएममध्ये असणार आहे.
SBIचे 42 कोटींपेक्षा जास्त खातेधारक एटीएममधून पैसे काढताना वन टाइम पासवर्डचा वापर करणार आहेत. बँकेच्या वतीने दिल्या गेलेल्या माहितीनुसार, ही सुविधा रात्री 8 वाजल्यापासून ते साकाळी 8 वाजेपर्यंत ग्राहकांना मिळणार आहे. SBI ने ही माहिती आपल्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केली आहे. बँकेने सुरक्षित बँकिंगच्या दिशेमध्ये एक पाऊल पुढे टाकलं आहे.
पैसे काढताना मोबाईल सोबत असणं गरजेचं
दहा हजारांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी या नियमांचं पालन करावं लागणार आहे. खास गोष्ट म्हणजे, तुमच्या बँक अकाउंटला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवर ओटीपी नंबर येणार आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्हा एटीएममधून 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तेव्हा तुमचा मोबाईल तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. तसेच हा पासवर्ड कोणासोबत शेअर करू नका.
संबंधित बातम्या :
मंदीतून बाहेर पडण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून बंपर ऑफर, 'या' गाड्यांवर खास ऑफर्स
आता केवळ तीन दिवसात मोबाईल नंबर पोर्ट होणार, ट्रायचे नवे नियम लागू