गांधीनगर: गुजरातमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार सत्तेत येण्याचा अंदाज एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. एबीपी न्यूज-सीएसडीएसने आज सर्वात मोठा एक्झिट पोल जाहीर केला. गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल.

गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा असून 92 हा बहुमताचा आकडा आहे.

सौराष्ट्र-कच्छचा कौल कुणाला? (एकूण जागा 54)


सौराष्ट्र-कच्छमध्ये कोणाच्या खात्यात किती मतं?
सौराष्ट्र-कच्छच्या 54 जागांवर नजर टाकल्यास एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलनुसार भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे. इथे भाजपला 49 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 41 टक्के आणि इतरांना 10% टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे.



जागांमध्ये कोणी बाजी मारली?
सौराष्ट्र-कच्छच्या 54 जागांमध्येही भाजपची आघाडी पाहायला मिळत आहे. भाजपला 31-37 जागा, काँग्रेसला 16-22 जागा आणि इतरांच्या खात्यात 0-2 जागा येण्याची शक्यता आहे. जागांच्या सरासरीवर नजर टाकली तर भाजपला 34 जागा, काँग्रेसला 19 जागा आणि इतरांच्या खात्यात केवळ एक जागा येण्याचं भाकित एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवलं आहे.



सौराष्ट-कच्छमधील 2012 मधील पक्षीय बलाबल



- सौराष्ट्र-कच्छ (54/182) : भाजप 49 टक्के, काँग्रेस 41 टक्के आणि इतर 10 टक्के मतं

- सौराष्ट्र-कच्छ (54/182) : भाजप 34, काँग्रेस 19 आणि इतर 1 जागांचा अंदाज

- सौराष्ट्र कच्छमध्ये भाजपला हार्दिक फॅक्टरचा फटका नाही, काँग्रेसला तीन जागांचा फायदा

गुजरातमध्ये मोदीच

गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 93 जागांसाठी मतदान पार पडलं. यानंतर एबीपी न्यूज-सीएसडीएसचा एक्झिट पोल जाहीर करण्यात आला.



यानुसार सौराष्ट्र-कच्छ, दक्षिण गुजरात, मध्य गुजरात आणि उत्तर गुजरातमध्ये भाजपच स्पष्ट मुसंडी मारण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. 182 जागांपैकी भाजपला तब्बल 117 जागा मिळण्याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. तर काँग्रसेला 64 जागा आणि इतरांना 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

-------------------

गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 93 जागांसाठी मतदान झालं. आज गुजरातचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे.

यापूर्वी गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यांमध्ये 89 जागांसाठी 9 डिसेंबरला 68 टक्के मतदान झालं होतं.

गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. गुजरातचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल. गुजरात आणि हिमाचल निवडणुकीचे सुपरफास्ट निकाल तुम्ही 18 तारखेला एबीपी माझावर पाहू शकाल.

मात्र त्यापूर्वी मतदान झाल्यानंतर म्हणजेच आज संध्याकाळपासून, एबीपी माझाच्या वेबसाईटवर गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर होईल.

संध्याकाळी 6 नंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर होतील.

संबंधित बातम्या

गुजरातचा सर्वात मोठा एक्झिट पोल