मी शेवटपर्यंत मनातून हार मानली नव्हती: साक्षी मलिक
एबीपी माझा वेब टीम | 18 Aug 2016 08:11 AM (IST)
रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या पैलवान साक्षी मलिकनं या यशाचं गुपित उघड केलं आहे. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ती बोलत होती. सुरुवातील 5-0 नं मागे पडलेल्या साक्षीनं तुफानी खेळ करीत विजय अक्षरश: खेचून आणला. याबाबतच बोलतान साक्षी म्हणाली की, 'सुरुवातीला मी 5-0नं मागे पडली होती. पण मी मनात हार मानली नव्हती. माझ्याकडे 3 मिनिटं होती. तेव्हा माझ्या मनात होतं की, या तीन मिनिटात मला माझं बेस्ट द्यायचं आहे. मी माझं बेस्ट दिलं आणि आज पदक माझ्या हातात आहे.' असं साक्षी म्हणाली. शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानता साक्षीनं विजयला गवसणी घातली. तिच्या या विजयामुळे भारतानं रिओ ऑलिम्पिकमध्ये आपलं पदकाचं खातं उघडलं. संबंंधित बातम्या: