ग्रेटर नॉएडामध्ये सचिनचा नवा फ्लॅट, किंमत फक्त...
एबीपी माझा वेब टीम | 12 May 2016 03:39 PM (IST)
नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं शेजारी व्हावं अशी इच्छा भारतातच नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांची असेल. सध्या नॉयडामधील काही रहिवाशांना हे भाग्य लाभणार आहे. ग्रेटर नॉयडा नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर) मध्ये नवीन फ्लॅट विकत घेतला आहे. सचिनने खरेदी केलेल्या या फ्लॅटची किंमत 1.68 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. क्रेसेंट क्रॉस लक्झरी अपार्टमेंटच्या अकराव्या मजल्यावर आहे. सचिनची पत्नी अंजली यांनी स्टॅम्प ड्युटीची 8.40 लाखांची रक्कम भरली. जेपी ग्रीन्स या शहरातील सर्वात मोठ्या टाऊनशीपचा क्रेसेंट कोर्ट हा एक भाग आहे. ही टाऊनशीप 452 एकरांवर पसरलेली आहे. यामध्ये 230 फ्लॅट्सचा समावेश आहे.