चेन्नईत फिरता पाळणा कोसळून अपघात, एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 12 May 2016 01:54 PM (IST)
चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये किश्किंता थीम पार्कमध्ये भीषण अपघात झाला आहे. फिरता पाळणा अचानक कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला आहे, तर सात जण जखमी आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव मणीकंदन असून तो 20 वर्षांचा होता. तर जखमी झालेले सातही जण या पार्कचेच कर्मचारी आहेत. जॉय राईडची चाचणी करत असतानाच हा अपघात घडल्याची माहिती आहे. पाळणा अंगावर पडल्यामुळे त्याखाली दबून कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनानं या संपूर्ण घटनेची चौकशी सुरु केली आहे. पाहा व्हिडिओ :